कोण आहे तितीक्षा तावडेचा होणारा नवरा? हिंदी मालिकांमध्ये काम, अजय देवगणबरोबरही केली आहे स्क्रीन शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 12:34 PM2024-02-09T12:34:47+5:302024-02-09T12:48:35+5:30

तितीक्षा तावडेचा होणारा नवरा आहे तरी कोण? बॉलिवूडमध्ये केलंय काम

मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तितीक्षाने केळवणाचे फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.

तितीक्षा अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तितीक्षा आणि सिद्धार्थ अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसायचे.

तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. आता ते लग्नाच्या बेडीत अडकणार असल्यामुळे चाहतेही खूश आहेत.

तितीक्षाप्रमाणेच सिद्धार्थही लोकप्रिय अभिनेता आहे. 'तू अशी जवळी राहा' या मालिकेत त्या दोघांनी एकत्र काम केलं होतं.

सिद्धार्थने अनेक मालिकांमध्ये काम करत कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठीबरोबरच तो हिंदी कलाविश्वातही हळूहळू जम बसवत आहे.

'गुम है किसी के प्यार मे' या गाजलेल्या हिंदी मालिकेत सिद्धार्थने महत्त्वपूर्ण भूमिका स्वीकारली होती.

याबरोबरच 'भय', 'टाइम बरा वाईट' या मराठी सिनेमांमध्ये तो झळकला आहे. 'अनन्या' या नाटकातील त्याच्या भूमिकेचंही कौतुक झालं होतं.

सिद्धार्थने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणबरोबरही काम केलं आहे. 'दृश्यम २' या सिनेमात तो झळकला होता.

या सिनेमात त्याने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर स्क्रीन शेअर केली होती.