भारीच! चित्रपटात छोट्या भूमिका करायचा 'चंदू चायवाला'; आता आठवड्याला कमावतो लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 12:32 PM2023-01-28T12:32:48+5:302023-01-28T12:39:29+5:30

Chandan Prabhakar : 'द कपिल शर्मा शो'मध्ये येण्यापूर्वी चंदन प्रभाकर याने काही पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

'द कपिल शर्मा शो' हा प्रसिद्ध कॉमेडी शो वर्षानुवर्षे लोकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. या शोचा प्रत्येक कलाकार लोकांना हसवण्याचे काम करत आहे, या शोने अनेक कलाकारांचे नशीब उजळले आणि त्यापैकी एक म्हणजे चंदू चायवालाची भूमिका करणारा चंदन प्रभाकर.

तुम्हाला माहिती असेलच की चंदन आणि कपिल हे बालपणीचे मित्र आहेत आणि त्यांच्या मैत्रीमुळे कपिलने चंदनला त्याच्या शोमध्ये काम करण्याची संधी दिली. 'द कपिल शर्मा शो'मध्ये येण्यापूर्वी चंदन प्रभाकर याने काही पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

द कपिल शर्मा शोमध्ये अनेकदा सिंपल लूकमध्ये दिसणारा चंदन प्रभाकर खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. चंदन हा पंजाबचा असून त्याला लहानपणापासूनच अभिनेता बनायचे होते. त्याने इंजिनिअरींग केलं आहे.

कपिल शर्मासोबत त्याने इंडियाज लाफ्टर चॅलेंजमध्ये भाग घेतला आणि येथून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. चंदन प्रभाकरला पंजाबी चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका मिळू लागल्या, ज्याबद्दल तो आधी खूप आनंदी होता.

चंदनला चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाला नाही. त्याचा मित्र कपिल शर्माने त्याला त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा ब्रेक दिला. 'द कपिल शर्मा शो'चा एक भाग असल्याने चंदन प्रभाकर लोकांना हसवण्यात कोणतीही कसर सोडत नाही.

आधी छोट्या छोट्या भूमिकांसाठी तो धडपडत असायचा आणि आज संपूर्ण देश त्याला ओळखतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चंदन एका आठवड्यासाठी शोसाठी 5 ते 7 लाख रुपये घेतो. याशिवाय मुंबईत त्यांचे स्वतःचे घर देखील आहे.

चंदन प्रभाकरकडे स्वतःची BMW 3 Series 320D कार देखील आहे, ज्याची किंमत सुमारे 40 लाख रुपये आहे आणि चंदन आज सातत्याने यशाच्या पायऱ्या चढत आहे आणि या यशात त्याचा मित्र कपिल शर्माचा मोठा हात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.