शर्मिष्ठाची लेक रुंजीला भेटली दुसरी 'रुंजी', 'ही' दिग्गज मराठी अभिनेत्री आहे तिची आई; ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:02 IST2026-04-16T12:33:41+5:302026-04-16T13:02:58+5:30

जेव्हा एक रुंजी दुसऱ्या रुंजीला भेटते..., शर्मिष्ठाने शेअर केले फोटो

मराठी अभिनेत्री आणि आता निर्माती म्हणून प्रसिद्ध असलेल्या शर्मिष्ठा राऊतने गेल्या वर्षी गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव 'रुंजी' असं ठेवण्यात आलं.

शर्मिष्ठा सोशल मीडियावर चिमुकल्या रुंजीचे फोटो शेअर करत असते. तसंच ती अनेकदा मालिकांच्या सेटवरही रुंजीला घेऊन जाते. त्यामुळे छोटी रुंजी ही मराठी इंडस्ट्रीत आतापासूनच प्रसिद्ध झाली आहे.

नुकतंच मराठीतील एका दिग्गज अभिनेत्रीने शर्मिष्ठाची घरी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे त्यांच्या मुलीचं नावही रुंजीच आहे. दोन रुंजींची भेट झाल्याचा फोटो शर्मिष्ठाने शेअर केला आहे.

ही अभिनेत्री आहे प्रतिक्षा लोणकर. दोन्ही अभिनेत्री 'अबोली' मालिकेत एकत्र दिसल्या होत्या. काही महिन्यांपूर्वीच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

मालिका संपल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्षा लोणकर आणि शर्मिष्ठाची भेट झाली. यावेळी दोघींचे कुटुंबीयही सोबत होते. शर्मिष्टाने त्यांच्या भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत.शर्मिष्ठा राऊत, तिचा नवरा तेजस देसाई, प्रतिक्षा लोणकर, त्यांचे पती आणि त्यांची मुलगी रुंजी असा कौटुंबिक फोटो आहे. यामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकमेकांना भेटून आनंद झालेला दिसत आहे.

प्रतिक्षा लोणकर यांना एक मुलगी आहे. तिचंही नाव रुंजी आहे. शर्मिष्ठाने दोन्ही रुंजींच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. 'When रुंजी meets रुंजी' असं कॅप्शन तिने लिहिलं आहे.

शर्मिष्ठाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी त्यावर पसंतीचा वर्षाव केला आहे. "एकाच नावाच्या दोन गुणी मुली एकाच फ्रेममध्ये," अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

प्रतिक्षा लोणकर यांची मुलगी रुंजी आईसारखीच दिसायला सुंदर आणि निरागस आहे.