PHOTOS: लेक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही अपूर्वाची आई राहते अत्यंत साधी, पाहा मायलेकीच्या जोडीचे दुबई टूरचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 01:08 PM2022-06-08T13:08:26+5:302022-06-08T20:20:15+5:30

लेक लोकप्रिय अभिनेत्री असतानाही अपूर्वाच्या आईच्या साधेपणा नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे.

शेवंता म्हणून प्रत्येक तरुणाला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर.रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या माध्यमातून अपूर्वाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळलील. या मालिकेमुळे ती रातोरात सुपरस्टार झाली. (Photo Instagram)

अपूर्वाने ‘आभास हा’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. पण ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतून तिला प्रचंड पसंती मिळाली. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं.(Photo Instagram)

मालिकेप्रमाणे कलाकारही रसिकांचे आवडते बनले होते. अपूर्वा र्सद्धा रसिकांची तितकीच आवडती अभिनेत्री बनली होती.(Photo Instagram)

तिने साकारलेल्या शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला होता.(Photo Instagram)

आज अपूर्वाचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच तीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दररोज तिच्याशी निगडीत काही ना काही अपडेट नेटकऱ्यांना देत असते.(Photo Instagram)

अपूर्वाने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दुबई व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये अपूर्वासोबत तिची आईदेखील दिसतेय. मायलेकी दुबईटूरवर गेल्या होत्या. तिथले धमाल करतानाचे फोटो अपूर्वाने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.(Photo Instagram)

आईसोबतचे दुबईतील भटकंतीचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत. अगदी विमानात बसल्यापासून ते प्रत्येक ठिकाणचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत.(Photo Instagram)

आपली लेक लोकप्रिय अभिनेत्री असतानाही त्यांच्यातील साधेपणा नेटकऱ्यांचं मन जिंकण्यास यशस्वी ठरत आहे.(Photo Instagram)

अपूर्वा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. (Photo Instagram)