'मुरांबा' फेम अभिनेत्याचं ठरलं! होणाऱ्या बायकोसोबत प्री वेडिंग फोटोशूट, लग्नाची तारीखही सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:46 IST2026-01-20T17:41:05+5:302026-01-20T17:46:45+5:30

सध्या मराठी कलाविश्वात सनई चौघडे वाजत आहेत. अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढले आहेत. आता आणखी एका मराठी अभिनेत्याची लगीनघाई सुरू आहे.

सध्या मराठी कलाविश्वात सनई चौघडे वाजत आहेत. अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढले आहेत. आता आणखी एका मराठी अभिनेत्याची लगीनघाई सुरू आहे.

अभिनेता सिद्धार्थ किरीद लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने सोशल मीडियावरुन प्रेमाची कबुली दिली होती.

आता सिद्धार्थने होणाऱ्या बायकोसोबत खास प्री वेडिंग फोटोशूट केलं असून याचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोशूटसाठी सिद्धार्थ शर्ट, जॅकेट आणि पँट असा खास लूक केला होता. तर त्याची होणारी पत्नी मैथिली हिने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता.

सिद्धार्थ आणि मैथिलीने फोटोसाठी खास पोझही दिल्याचं दिसत आहे. त्यासोबतच खास अंदाजात त्यांनी वेडिंग डेटही जाहीर केली.

सिद्धार्थ आणि मैथिली येत्या २३ जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

त्यांच्या फोटोंवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनीही त्यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थने फ्रेशर, मुरांबासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.