पारंपरिक कपड्यांना वेस्टर्न टच! जुई गडकरीचा खणाचा डिझायनर ड्रेस चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 01:30 PM2024-03-13T13:30:00+5:302024-03-13T13:30:00+5:30

Jui gadkari: जुईने पहिल्यांदाच वेस्टर्न टच असलेला लूक केला होता. तिने हा ड्रेस चक्क खणाच्या कापडापासून तयार केला होता.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. उत्तम अभिनयाच्या जोरावर जुईने अल्पावधीत लोकप्रियता मिळली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जुई सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. यात खासकरुन तिच्या पर्सनल आयुष्याची चर्चा रंगत आहे.

अलिकडेच जुईने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या पर्सनल आयुष्याविषयी बरेच खुलासे केले.

जुई सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.त्यामुळे कायम तिच्याविषयीचे अपडेट ती चाहत्यांना देते.

अलिकडेच तिने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

जुई कायम तिच्या साध्या आणि सिंपल लूकमुळे चर्चेत येत असते. मात्र, यावेळी तिने तिच्या लूकमध्ये एक ट्विस्ट केला.

जुईने पहिल्यांदाच वेस्टर्न टच असलेला लूक केला होता. तिने हा ड्रेस चक्क खणाच्या कापडापासून तयार केला होता.

या आऊटफिटला सूट होणारा असा सुरेख मेकअप जुईने केला होता.