'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा मोहक अंदाज, फोटो पाहून प्रेमात पडाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 03:40 PM2024-06-24T15:40:41+5:302024-06-24T15:45:12+5:30

शिवाली तिच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून घराघरात पोहोचली. उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते.

शिवालीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

शिवाली तिच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये शिवालीचा मोहक अंदाज पाहायला मिळत आहे. शिवालीने गुलाबी रंगाच्या प्रिंटेड ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

केस मोकळे सोडत तिने साजेसा मेकअप केल्याचं पाहायला मिळत आहे. केसांत माळलेल्या फुलामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.

अगदी साध्या लूकमध्येही शिवालीचं सौंदर्य खुलून आलं आहे. शिवालीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

दरम्यान शिवालीने काही मालिका आणि सिनेमांतही काम केलं आहे.