Indian Idol 12 फेम सायली कांबळेच्या मराठमोळ्या लूकला मिळतेय पसंती, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 07:47 PM2022-09-05T19:47:52+5:302022-09-05T19:55:49+5:30

Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं गौरी पूजनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि लिहिले की, माझा पहिला ववसा..

‘इंडियन आयडल 12’ची सेकंड रनर अप सायली कांबळे (Sayli Kamble) हिने आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

Indian Idol 12 शोमधून सायली कांबळेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

या शोनंतर सायली कांबळेच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही चांगलीच वाढ झाली आहे.

सायली कांबळे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.

सायली कांबळेनं लग्नानंतरचा पहिला सण म्हणजे गणेशोत्सव साजरा करते आहे. त्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे.

सायली कांबळेनं गौरी पूजनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि लिहिले की, माझा पहिला ववसा..

तसेच तिने नवऱ्यासोबतचेही फोटो शेअर केले आहेत.

सायली कांबळेच्या मराठमोळ्या लूकला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.