स्नेहा वाघच्या धाकट्या बहिणीला पाहिलंत का? अभिनेत्रीइतकीच आहे सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 03:20 PM2023-09-27T15:20:08+5:302023-09-27T15:24:52+5:30

Sneha wagh: क्रितिका सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम स्नेहासोबतचे फोटो शेअर करत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ. उत्तम अभिनयामुळे स्नेहा अल्पावधीत लोकप्रिय झाली.

स्नेहाने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

स्नेहाचा मराठीपेक्षा हिंदी सिनेसृष्टीत जास्त वावर आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये ती कायम चर्चेत असते.

बिग बॉस मराठीमध्ये स्नेहा झळकल्यानंतर तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिची पर्सनल लाइफही प्रकाशझोतात आली.

बिग बॉस मराठी हा शो संपल्यानंतरही स्नेहाच्या पर्सनल आयुष्याची चर्चा थांबली नाही. अनेक जण तिच्या कुटुंबियांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात.

सध्या नेटकऱ्यांमध्ये स्नेहाच्या सख्ख्या बहिणीची चर्चा रंगली आहे.

स्नेहा वाघला सख्खी एक बहीण असून ती स्नेहापेक्षा लहान आहे.

क्रितिका वाघ असं स्नेहाच्या धाकट्या बहिणीचं नाव असून तिला नृत्याची विशेष आवड आहे.

क्रितिका सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम स्नेहासोबतचे फोटो शेअर करत असते.