Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये स्नेहलता वसईकरची एन्ट्री, सोशल मीडियावरच्या बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 10:17 AM2022-10-31T10:17:36+5:302022-10-31T10:24:33+5:30

Snehlata Vasaikar : ‘बिग बॉस मराठी 4’ सध्या जाम चर्चेत आहे. होय, आता बिग बॉस मराठीच्या घरात नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे. होय, टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री घरात दाखल झाली आहे.

‘बिग बॉस मराठी 4’ सध्या जाम चर्चेत आहे. होय, आता बिग बॉस मराठीच्या घरात नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे. होय, टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री घरात दाखल झाली आहे.

कधी स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्या मालिकेतील ऐतिहासिक भूमिका तर कधी ‘अनुराधा’ सिरीजमध्ये साकारलेली जिगरबाज लेडी पोलीस ऑफिसर अशा वेगवेगळ्या रूपात तुम्ही तिला पाहिलं असेल. तिचं नाव स्रेहलता वसईकर.

वाईल्ड कार्ड म्हणून ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात धमाकेदार एन्ट्री घेणाऱ्या स्रेहलता वसईकर हिला तुम्ही सगळेच ओळखता. टीव्हीवरचा तो लोकप्रिय चेहरा आहे.

स्रेहलताला अनेक ऐतिहासिक भूमिकांमध्ये तुम्ही बघितलं असेलच. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये तिने सोयरा बाईसाहेब ही भूमिका साकारली होती.

अनेक मराठी मालिकांमुळे ती घराघरांत पोहचली. तिचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. पण सोयराबाईच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. तिची ही भूमिका प्रचंड गाजली.

स्रेहलता वसईकर विशेषत: ऐतिहासिक भुमिकांसाठी खास ओळखली जाणारी. ‘फू बाई फू’मधून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, ऐतिहासिक भूमिकांमुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली.

स्नेहलताने मराठीसह हिंदी ऐतिहासिक मालिकांमध्येही काम केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई, स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकांमध्ये ती झळकली आहे.

स्नेहलताने संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात भानू ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक करण्यात आलं होतं.

काही हिंदी मालिकेतून अभिनय साकारत असताना तिने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय काही शोचे सूत्रसंचालन केलं होतं.

स्रेहलता रिअल लाईफमध्ये प्रचंड बोल्ड आहे. सोशल मीडियावर ती बोल्ड, ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. यावरून ती अनेकदा ट्रोलही होते. पण स्नेहलताला यामुळे फरक पडत नाही.

मी एक कलाकार आहे आणि माझं एक खासगी आयुष्य सुद्धा आहे... मी रील आणि रिअल लाईफ ही वेगवेगळी ठेवणच पसंत करते ..., अशी तिची भूमिका आहे आणि त्यामुळे जग काय म्हणेल याची तिला अजिबात पर्वा नाही.

स्नेहलता वसईकरच्या येण्याने बिग बॉसच्या घरातील समीकरण किती बदलणार? नात्यांमध्ये काय बदल होणार ? यासारखे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. त्यामुळे येणारा आठवडा खूपच रंजक असणार आहे.