स्नेहा वाघ is back; बिंधास्त अन् बोल्ड फोटो शेअर करत वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 07:20 PM2022-02-10T19:20:24+5:302022-02-10T19:28:58+5:30

Sneha wagha:स्नेहाने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. त्यामुळे तिची नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असते.

बिग बॉस मराठी ३ या शोच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ.

बिग बॉसच्या घरात तिच्या टास्क खेळण्यापेक्षा पर्सनल लाइफमुळे ती सर्वात जास्त चर्चिली गेली.

कलाविश्वाप्रमाणेच स्नेहा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय आहे.

अलिकडेच स्नेहाने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यातील काही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

स्नेहाने पिवळ्या रंगाच्या पंजाबी सूटमध्ये हे खास फोटोशूट केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर स्नेहाच्या या नव्या फोटोंची चांगलीच चर्चा रंगतांना दिसत आहे.

स्नेहाने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करुन एक स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे.

वयाच्या १३ व्या वर्षापासून स्नेहा कलाविश्वात सक्रीय आहे.

अधूरी एक कहाणी या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

स्नेहाने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. त्यामुळे तिची नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असते.