डेनिम शर्ट अन् साडी..., ‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूरचं हटके फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 01:42 PM2022-02-20T13:42:46+5:302022-02-20T13:56:48+5:30

Sai Lokur Photoshoot: डेनिम शर्ट अन् पांढऱ्या रंगाची साडी, पायात व्हाईट शूज अशा हटके अंदाजातील सई लोकूरच्या फोटोंनी अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सई लोकूर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय आहे. अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी तिची चर्चा कमी नाही.

अलीकडे सईने असे काही फोटो शेअर केले की, ते पाहून सगळ्यांनीच तिला दाद दिली. होय, तिच्या या हटके फोटोंवर अनेकांच्या नजरा खिळल्या.

निळ्या रंगाची डेनिम शर्ट अन् पांढऱ्या रंगाची साडी, पायात व्हाईट शूज अशा हटके अंदाजातील तिच्या या फोटोंनी अनेकांचं लक्ष वेधलं.

या फोटोंमध्ये सईने एकापेक्षा एक भारी पोझ दिल्या आहेत. तिचा हा अनोखा स्वॅग, हटके अदा बघण्यासारख्या आहेत.

अर्थात काहींना सईचा हा स्वॅग आवडला आहे तर काहींनी नेहमीप्रमाणे यावरून सईला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

फॅशनच्या नावाखाली काहीही करतात, बकवास, भूत अशा कमेंट्स ट्रोलर्सनी केल्या आहेत. काहींना मात्र तिचा हा अंदाज आवडला आहे.

30 नोव्हेंबर 2020 रोजी सईने तीर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून सई तिच्या नवऱ्यासोबतचे काही फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.