भारती सिंगचं बाळ आहे तिच्याप्रमाणे गुबगुबीत, चिमुकल्या लक्ष्यचे क्युट फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 08:49 PM2022-07-11T20:49:40+5:302022-07-11T20:52:51+5:30

Bharti Singh And Harsh Limbachiya: एप्रिलमध्ये हर्ष आणि भारतीच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले होते आणि आता बाळाचे क्युट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची जोडी प्रेक्षकांना खूप भावते. हर्ष आणि भारतीचे प्रेमच नाही तर या जोडप्याचे मजेशीर जोक्सही चाहत्यांना आवडतात.

एप्रिलमध्ये हर्ष आणि भारतीच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले होते आणि बऱ्याच दिवसांनंतर या जोडप्याने मुलाचे नाव जाहीर केले.

पण चेहरा दाखवला नव्हता. मात्र आता या जोडप्याने चाहत्यांना मुलाचा चेहरा दाखवला आहे.

हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगने बाळाचे नाव लक्ष्य ठेवले आहे. हे नाव चाहत्यांना खूप आवडले आहे.

हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता त्यांनी सोशल मीडियावर बाळाचे फोटो शेअर केले आहेत.

लक्ष्यचे क्युट फोटोशूट केले आहे. या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे.

लक्ष्यचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

३ डिसेंबर २०१७ रोजी हर्ष आणि भारती विवाहबंधनात अडकले. यानंतर भारती सिंगने ३ एप्रिल २०२२ रोजी चाहत्यांना खुशखबर दिली.

भारती आणि हर्ष मुलाला प्रेमाने गोला म्हणतात आणि चाहते गोलाच्या पहिल्या झलकसाठी खूप दिवसांपासून उत्सुक होते.