'बाळूमामा' फेम अभिनेता सुमीत पुसावळेनं बांधली लग्नगाठ, पाहा वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 01:25 PM2022-12-15T13:25:09+5:302022-12-15T13:28:33+5:30

बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमीत पुसावळे (Sumeet Pusavale) याने मोनिकासोबत सात फेरे घेत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नसराई सुरू आहे. डिसेंबर महिन्यात अक्षया देवधर-हार्दीक जोशी, आशय कुलकर्णी-सानिया गोडबोले यांच्यानंतर काल अभिनेता सुमीत पुसावळेनेदेखील विवाह बंधनात अडकला आहे.

बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमीत पुसावळे (Sumeet Pusavale) चा बुधवारी १४ डिसेंबर रोजी विवाह पार पडला.

सुमीत पुसावळे याने मोनिकासोबत सात फेरे घेत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.

लग्न मंडपात लग्नाच्या आदल्या दिवशी साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्याचे फोटोदेखील समोर आले आहेत.

सांगोला येथे विवाहसोहळा अगदी थाटमाट पार पडला असून या लग्नाला त्याच्या सहकलाकारांनी, मित्र मंडळींनी तसेच नातेवाईकांनी हजेरी लावली होती.

तर मराठी सेलिब्रिटींनी त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.

अभिनेता सुमीत पुसावळे याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. लागिर झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्येही त्याने काम केले आहे.

बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळतो आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते.