वयाच्या १६व्या वर्षात ही अभिनेत्री झाली कास्टिंग काउचची शिकार, नाईलाजास्तव केले B Grade सिनेमात काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 01:17 PM2024-02-13T13:17:58+5:302024-02-13T13:24:29+5:30

या अभिनेत्रीला बिग बॉस शोमधून खूप लोकप्रियता मिळाली.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई आज म्हणजेच १३ फेब्रुवारीला ३८ वा वाढदिवस साजरा करते आहे. आज ती टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. मात्र तिचा इथपर्यंतचा प्रवास खूपच खडतर होता.

रश्मी देसाईने खूप कमी वयात काम करायला सुरूवात केली होती. काम मिळवण्याच्या नादात तिने खूप गोष्टींचा सामना केला. तिने तिच्या करिअरची सुरूवात २००२ साली असमिया चित्रपटातून केली होती. चित्रपटात तिची भूमिका खूप छोटी असल्यामुळे ती लोकांच्या नजरेत आली नाही. २००६ साली तिने रावण मालिकेतून पदार्पण केले.

मालिका आणि सिनेमा व्यतिरिक्त रश्मी देसाईने भोजपुरी चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केलंय. तिने बी ग्रेड सिनेमातही काम केले आहे. तिला खरी ओळख उतरन मालिकेतून मिळाली आहे. यात तिने तपस्याची भूमिका केली होती. त्यानंतर ती दिल से दिल तक या मालिकेत दिसली होती.

रश्मीचं बालपण खूप खडतर होते. एकदा तिने स्ट्र्गल काळाबद्दल सांगताना कास्टिंग काऊचचा खुलासा केला होता. पिंकव्हिलाशी बोलताना रश्मी देसाई म्हणाली होती की, माझी आई एक सिंगल पॅरेंट होती. आमची आर्थिक परिस्थिती बिकट होती. माझी आई जे कमावायची त्यावर आमचे घर चालत होते. आमच्या कडे दोन वेळच्या जेवणासाठीदेखील पैसे नव्हते.

वयाच्या १६व्या वर्षांपासून मी कमवायला सुरूवात केली होती. बालपणी लोक तिला पणवती म्हणायचे. तिने एकदा विषही प्राशन केले होते. रश्मीला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक मानते.

रश्मी कास्टिंग काऊचचाही शिकार झाली आहे. तिने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, जेव्हा ती ऑडिशनसाठी गेली होती तेव्हा तिथे असलेल्या एका व्यक्तीने तिच्या ड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिक्स करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुसऱ्या दिवशी तिच्या आईने त्या व्यक्तीची चांगलीच धुलाई केली होती. तेव्हा ती फक्त १४ वर्षांची होती. तेव्हा तिला सिनेमाबद्दल फार कमी जाण होती.

रश्मीने सांगितले होते की, एक व्यक्ती होता जो माझा फायदा घेत होता. तिच्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने तिला कॉल करुन ऑडिशनसाठी बोलवले होते.

ती तिथे गेल्यावर तिकडे कुणीच नव्हते. तिथे कॅमेराही नव्हता. तिच्या ड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिसळून तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अपयशी ठरला.

रश्मी देसाई टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. बिग बॉस १३मध्ये सहभागी झाल्यानंतर तिने अडीच कोटींपेक्षा जास्त मानधन घेतले होते. याशिवाय ती खतरों के खिलाडीमध्येही सहभागी झाली होती.

रश्मीकडे ५ फ्लॅट आणि महागड्या गाड्यांचंही कलेक्शन आहे. ज्यात ६० लाखांपासून ३ कोटींपर्यंतच्या मर्सिडिज गाडीचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्याकडे एकूण १०.१२ कोटींची मालमत्ता आहे.