पारंपरिक सोहळ्याचा शाही थाट! अमृता-प्रसादने बांधली सातजन्माची गाठ, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 06:53 PM2023-11-18T18:53:34+5:302023-11-18T18:58:30+5:30

ही अनोखी गाठ कोणी बांधली! अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो पाहा

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे ही कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आज विवाहबंधनात अडकली आहे. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अमृता-प्रसादचा शाही विवाहसोहळा पार पडला.

पारंपरिक पद्धतीने अमृता-प्रसाद लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अमृता-प्रसादच्या लग्नात पांरपरिक विवाहसोहळ्याचा शाही थाट पाहायला मिळाला.

प्रसाद आणि अमृताने लग्नासाठी खास पांरपरिक लूक केला होता. गुलाबी रंगाच्या साडीत अमृताचं सौंदर्य खुलून आलं होतं. तर धोतर, सदरा आणि टोपी असा मराठमोळा लूक प्रसादने केला होता. या लूकमध्ये प्रसाद राजबिंडा दिसत होता.

अमृता-प्रसादच्या लग्नाला कलाविश्वातील कलाकारांनी हजेरी लावली होती. रश्मी अनपट, ओंकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर, शुभांकर तावडे, ऋतुराज शिंदे, प्रार्थना बेहेरे या कलाकारांनी हजेरी लावली होती.

अमृता-प्रसाद यांच्या विवाहसोहळ्यातील खास क्षण. सप्तपदी घेत अमृता-प्रसाद लग्नाच्या बेडीत अडकले.

रिसेप्शनसाठी अमृताने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर प्रसादने कुर्ता-पायजमा घालून फेटा बांधला होता.

'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रसाद आणि अमृताची पहिली भेट झाली होती. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात ते दोघेही सहभागी झाले होते.

'बिग बॉस'च्या घरातच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. घरातून बाहेर पडताच त्यांनी प्रेमाची कबुली देत गुपचूप साखरपुडाही उरकला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.