“तिला काम मिळणार नाही.." हृता दुर्गुळे ठरली बॉडी शेमिंगची शिकार, अभिनेत्री संतापली म्हणाली-“माझं वजन…”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 09:52 AM2023-04-14T09:52:58+5:302023-04-14T10:16:48+5:30

पार्टीत आलेला एक विचित्र अनुभवाबाबत ह्रताने भाष्य केलं आहे.

अनेक तरुणांची क्रश असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळ (hruta durgule). उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे हृताने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. (फोटो इन्स्टाग्राम)

'फुलपाखरु' या मालिकेपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या हृताने मोठ्या पडद्यापर्यंत उडी मारली आहे. सध्या ती तिच्या सर्किट चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

ह्रताला या प्रवासादरम्यान अनेक चांगल्या वाईट प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. याबाबत तिनं पहिल्यांदाच भाष्य केलंय. (फोटो इन्स्टाग्राम)

सुलेखा तळवळकर यांच्या 'दिल के करीब' या कार्यक्रमा दरम्यान ह्रताने तिच्या बाबतीत घडलेला एका प्रसंग सांगितला. (फोटो इन्स्टाग्राम)

एका पार्टी दरम्यान तिच्या वाढलेल्या वजनावर कमेंट करण्यात आली होती. यावर तिनं भाष्य केलं. (फोटो इन्स्टाग्राम)

ह्रता म्हणाली, ''अलिकडेच एका पार्टीमध्ये कोणीतरी माझ्या वजनाबाबत कमेंट केली होती. कारण मध्यंतरी माझं वजन वाढलं होतं.'' (फोटो इन्स्टाग्राम)

''पार्टीत एका व्यक्तीने म्हटलं होतं की बरं झालं ह्रताचं वजन वाढतंय त्यामुळे तिला कामं तरी मिळणार नाहीत. (फोटो इन्स्टाग्राम)

त्यामुळे तिची काम तरी निदान आम्हाला मिळतील. त्यावेळी त्या पार्टीमध्ये मी नव्हते. मला माझ्या जवळच्या एका व्यक्तीने हे सांगितलं. मी माझं वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत होते.'' (फोटो इन्स्टाग्राम)

ह्रता पुढे म्हणाली, मी अशा बऱ्याच प्रसंगांचा वेळा सामना केला आहे. पण माझ्याबाबत केलेली अशी कमेंट ऐकून मला असं वाटलं की, लोक आपल्याबाबत असं कसं बोलू शकतात?, (फोटो इन्स्टाग्राम)

काम मिळवण्यासाठी मला अशा गोष्टींची गरज वाटत नाही. पुढे जाण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचे पाय खेचणं चुकीचं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)