'या' 5 लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी सोडली इंडस्ट्री; विदेशात झाल्या कायमच्या स्थायिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 01:36 PM2023-09-07T13:36:13+5:302023-09-07T13:42:08+5:30

Marathi actresses: लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी कुटुंबासाठी सोडलं कलाविश्व

मृणाल दुसानीस - माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस. उत्तम अभिनयामुळे लोकप्रिय ठरलेली ही अभिनेत्री आता अमेरिकेत कायमची स्थायिक झाली आहे.

तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई, हे मन बावरे अशा मालिका गाजवणारी मृणाल सध्या अमेरिकेत राहत असून तिला नुरवी ही मुलगीदेखील आहे.

नेहा गद्रे - नेहा गद्रे हे नाव कोणासाठीही नवीन नाही. मन उधाण वाऱ्याचे, गडबड झाली, मोकळा श्वास अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.

नेहा सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक असून तिने तिथे नव्या क्षेत्रात करिअर सुरु केलं आहे.

चैत्राली गोखले - आभाळमाया, इंद्रधनुष्य अशा गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली चैत्राली गोखले सध्या टेक्सासमध्ये स्थायिक आहे.

चैत्रालीने अभिनयापासून पूर्णपणे फारकत घेतलेली नाही. ती स्थानिक नाटकांमध्ये काम करताना दिसते.

सुजाता जोशी - साडे माडे तीन, एका लग्नाची गोष्ट, शुभंकरोती या मालिका, सिनेमांमध्ये झळकेली सुजाता जोशी विदेशात स्थायिक झाली आहे.

सुजाता सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. इथे ती तिच्या कुटुंबियांसोबत राहते.

उमा पेंढारकर - अग्गंबाई सुनबाई या मालिकेतून लोकप्रिय झालेली उमा पेंढारकर सध्या न्युझिलंडमध्ये स्थायिक झाली आहे. सध्या ती तिचं युट्यूब चॅनेलवरुन चाहत्यांच्या भेटीला येत असते.

उमाचा पती ऋषिकेश पेंढारकर न्युझिलंडला गेल्यामुळे तिनेदेखील सिनेइंडस्ट्री सोडून नवऱ्यासोबत विदेशात स्थायिक झाली आहे.