'बजेट' भारी, 'स्टार कास्ट' भारी, अन्...! रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' आजवरच्या ऐतिहासिक सिनेमांपेक्षा वेगळा का ठरतोय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:34 IST2026-04-30T13:14:08+5:302026-04-30T13:34:38+5:30
सध्या रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमाची खूप उत्सुकता आहे. रितेश या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा आजवरच्या ऐतिहासिक सिनेमांपेक्षा वेगळा का ठरतोय? त्याची इतकी चर्चा का आहे? जाणून घ्या '

सध्या रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमाची खूप उत्सुकता आहे. रितेश या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा आजवरच्या ऐतिहासिक सिनेमांपेक्षा वेगळा का ठरतोय? त्याची इतकी चर्चा का आहे? जाणून घ्या

'राजा शिवाजी' सिनेमाचं बजेट हे आजवरच्या मराठी सिनेमांपेक्षा खूप जास्त आहे. तब्बल १०० कोटींमध्ये 'राजा शिवाजी' सिनेमा बनवण्यात आला आहे. शिवरायांचा समृद्ध ऐतिहासिक काळ पुन्हा जिवंत करण्यासाठीी कोणतीच कसर बाकी ठेवण्यात आलेली दिसत नाहीये. जास्त बजेटमध्ये सिनेमाची निर्मिती झाल्याने 'राजा शिवाजी'मधील प्रसंग भव्यदिव्य होण्यास मदत झाली आहे.

'राजा शिवाजी'ची स्टारकास्ट ही तगडी आहे. रितेशने छोट्या छोट्या भूमिकांसाठी कलाकारांची अचूक निवड केली आहे. अफजलखान म्हणून संजय दत्त, बडी बेगम म्हणून विद्या बालन, संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिषेक बच्चन ही समर्पक कास्टिंगची उदाहरणं आहेत. विशेष म्हणजे यानिमित्ताने बॉलिवूड गाजवणारी हे कलाकार पहिल्यांदाच मराठी सिनेमात झळकणार आहेत. आणि हो! सलमान भाऊसुद्धा सिनेमात असणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'राजा शिवाजी' निमित्त प्रेक्षकांना एक खास गोष्ट बघायला मिळणार आहे. ती म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्यांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यातलं नातं. आजवर कोणत्याही सिनेमात ही गोष्ट दाखवण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रेक्षकांना या दोन भांवंडांमधलं नातं बघायला मिळेल.

'राजा शिवाजी'साठी रितेशने छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील एक असा काळ निवडला आहे जो आजवर फार कमी बघायला मिळाला आहे. छत्रपती शिवराय यांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्याही आयुष्याबद्दल आपल्याला यानिमित्ताने सविस्तर जाणून घेता येणार आहे.

अशाप्रकारे 'राजा शिवाजी' सिनेमा आजवरच्या सिनेमांपेक्षा वेगळा ठरतोय. सर्वांना हा ऐतिहासिक पट मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्कंठा आहे.

१ मे २०२६ रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रितेश देशमुख सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून त्याच्यासोबत जिनिलीया देशमुख, संजय दत्त, फरदीन खान, विद्या बालन, संजय दत्त हे कलाकारही झळकणार आहेत.

















