Rakhi Sawant : "आदिलला कोट्यवधींचं कर्ज दिलं", राखी सावंतचा दावा; फोटो शेअर करत दिले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 05:49 PM2023-10-19T17:49:34+5:302023-10-19T18:13:03+5:30

Rakhi Sawant : राखीने लोकांना सांगितलं की, तिने आर्थिक मदतीसाठी आदिलला अनेक कोटी रुपये दिले आहेत.

सोशल मीडिया क्वीन राखी सावंत आदिल खान दुर्रानीसोबतच्या वादामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखी सावंतने सांगितले की, आदिल खानने तिची फसवणूक केली आणि तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले.

आदिलवर पैसे घेऊन पळून गेल्याचा आरोपही तिने केला आहे. तर आदिल खानचे म्हणणे आहे की, राखीचे हे सर्व आरोप खोटे आहेत. सध्या राखी सावंतने सोशल मीडियावर काही कायदेशीर कागदपत्रांचे फोटो शेअर केले आहेत.

राखीने लोकांना सांगितलं की तिने आर्थिक मदतीसाठी आदिलला अनेक कोटी रुपये दिले आहेत. राखीने आदिलला व्यवसायात मदत करण्यासाठी एक कोटी पन्नास लाख रुपयांचं कर्ज दिल्याचं वृत्त आहे.

या प्रकरणात राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही चेकचे फोटो शेअर केले आहेत जे तिच्या नावावर होते. मात्र त्यांच्यावर आदिल खान दुर्रानीने सही केली होती.

ही कागदपत्रे सोशल मीडियावर शेअर करताना राखीने एक मोठी नोटही लिहिली आहे. "माझ्यात उभे राहण्याची हिंमत आहे आणि मला हे देखील माहित आहे की मी पुन्हा उठून चमकेन. मी पोस्ट केलेले फोटो हे मला धोका दिल्याचे फोटो आहेत."

"प्रेमाच्या नावाखाली माझी फसवणूक झाली आहे. विश्वासघात झाला आहे, आश्वासनं देऊन विश्वासघात केला आहे. या माणसाने प्रेमाने विश्वास संपादन केला, मला त्याचा धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं आणि नंतर पैसे आणि कुटुंब नसताना मला सोडलं"

"इतक्या मोठ्या कारकिर्दीनंतर मी आता अशा टप्प्यावर आहे जिथे मी शून्यापासून सुरुवात करणार आहे. माझी किंवा माझ्या राहण्याचा खर्च करणारं, काळजी घेणारं आता कोणी नाही" असं राखीने म्हटलं आहे.

"माझ्याकडे जी काही बचत होती, ती सर्व काही त्याने माझ्याकडून घेतलं आहे आणि मी ती देखील प्रेमापोटी दिलं आहे. हे सर्व शेअर करून मी देवाला प्रार्थना करते की मला परत लढण्याची शक्ती द्या."

"मला माहीत आहे की, देव नेहमी माझ्याबरोबर आहे. आदिल तुझं कर्म तुझ्याकडे परत येईल आणि तुला तुझ्या पापांची किंमत मोजावी लागेल" असं देखील राखी सावंतने म्हटलं आहे. याआधी देखील राखी आणि आदिलने एकमेकांवर गंभीर आरोप केलेले आहेत.