रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात 'मुरांबा' फेम अभिनेत्रीची वर्णी; गाण्यात दिसली झलक, तुम्ही ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:56 IST2026-04-17T13:37:20+5:302026-04-17T14:56:46+5:30

काय सांगता! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दिसणार 'राजा शिवाजी' चित्रपटात, कोण आहे ती?

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'राजा शिवाजी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाची प्रचंड चर्चा आहे.

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या १ मे २०२६ रोजी रिलीज होणार आहे.

यामध्ये रितेश देशमुखसह जिनिलिया देशमुख, महेश मांजरेकर, संजय दत्त, अभिषेक बच्चन,विद्या बालन, फरदीन खान, सचिन खेडेकर,जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते अशा तगड्या कलाकारांची फळी आहे.

नुकतंच या चित्रपटातील 'छत्रपती'हे नवीन गाणं प्रदर्शित झालं. अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय. तर रेमो डिसुझा या गाण्याचा कोरिओग्राफर आहे. त्यांनी या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

या गाण्यात मराठी मालिकाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्रीची झलक पाहायला मिळतेय.

या गाण्यात मराठी मालिकाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्रीची झलक पाहायला मिळतेय.

'मुरांबा' मालिकेत रमाची भूमिका साकारून शिवानीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.आता या चित्रपटामधील गाण्यात तिची झलक पाहून प्रेक्षक सुखावले आहेत.

दरम्यान,'राजा शिवाजी' चित्रपटात शिवानी कोणती भूमिका साकारणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसंच शिवानीने देखील या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.