Hotness Alert! मौनी रॉयने बॉडीकॉन ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, चाहते झाले फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 02:17 PM2024-05-01T14:17:10+5:302024-05-01T14:21:38+5:30

अभिनेत्री मौनी रॉयने आपले सौंदर्य आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

केवळ तिच्या मेहनत आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे.

मौनी रॉय तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चत असते. त्यामुळे तिचे चाहते तिच्या नव्या लुकसाठी उत्सूक असतात.

मौनी रॉय सोशल मीडिया देखील सक्रिय असते. अलीकडेच मौनीने तिच्या इन्स्टाग्रामवर सोनेरी ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत , ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Don’t be a part of the problem, be the entire problem अर्थात "समस्येचा भाग होऊ नका, तर संपूर्ण समस्या व्हा” असं कॅप्शन या पोस्टला तिनं दिलं आहे.

मौनी रॉयने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी बोल्ड मेकअप आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये मौनी रॉयची फिट फिगरही स्पष्ट पाहायला मिळत आहे. आपल्या किलर स्टाईलने तिनं चाहत्यांची मने घायाळ केली आहेत.

मौनी रॉयने आपल्या अनेक वेगवेगळ्या कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक सिझलिंग पोज देताना दिसत आहे.

पारंपारिक असो वा वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये मौनी सुंदर दिसते यात शंका नाही. लोक तिच्या स्टाईलवरून नजर हटवू शकत नाहीत

मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती अलिकडेच प्रदर्शित झालेल्या अभिनेता इमरान हाश्मीच्या 'शोटाइम' सीरिजमध्ये दिसली होती.