Mithun Chakraborty: 5 लक्झरी पंचतारांकित हॉटेल्सचे मालक आहेत मिथुन चक्रवर्ती, जगतात आलिशान लाईफ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 03:54 PM2022-04-30T15:54:57+5:302022-04-30T15:57:14+5:30

Mithun Chakraborty: अभिनयासोबतच हॉटेल व्यवसायातून मिथुन वर्षाला कोट्यवधी रुपयांची कमाई करतात.

बॉलिवूडमध्ये डिस्को किंग अशी ओळख असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती भारतातील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यानी आतापर्यंत शेकडो चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबत ते राजकारण आणि हॉटेल व्यवसायामध्येही मोठा ठसा उमटवला आहे.

अभिनयासोबतच इतर व्यवसायांमधून मिथुन दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 40 मिलीयन डॉलर्स(भारतीय रुपयांनुसार अडीचशे कोटी)पेक्षा जास्त आहे.

आज लक्झरी लाइफ जगणाऱ्या मिथुन यांचे सुरुवातीचे दिवस अतिशय गरिबीचे होते. आज जरी त्यांचे नाव बॉलीवूडच्या काही श्रीमंत कलाकारांच्या यादीत असले, तरीदेखील एकेकाळी त्यांना राहायला घर नव्हते.

पण, आपल्या मेहनतीच्या जोरावर मिथुन चक्रवर्ती यांनी मोठी उंची गाठली असून, त्यांच्या एकूण संपत्तीमधील बहुतांश कमाई त्यांच्या आलिशान हॉटेल्समधून करतात.

मिथुन उटी येथील आलिशान मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्सचे मालक असून, त्याचा व्यवसाय सुमारे 250 कोटींचा आहे. याशिवाय, त्यांची अनेक शहरांमध्ये मोठी हॉटेल्स आहेत. उटीसोबतच म्हैसूर आणि दक्षिणेतील अनेक शहरांमध्ये त्यांची हॉटेल्स आहेत.

मिथुनचे मुंबईसह अनेक शहरांमध्ये आलिशान फ्लॅट्सदेखील आहेत. मिथुन हा सर्व व्यवसाय आपल्या मुलांसमवेत हाताळतात. त्यांच्या उटी येथील हॉटेल मोनार्कमध्ये 59 खोल्या, 4 लक्झरी सुइट्स, आरोग्य फिटनेस सेंटर, इनडोअर स्विमिंग पूल आहे.

मिथुनच्या मोनार्क सफारी पार्क मसीनागुडीमध्ये 16 बंगले, 14 ट्विन लॉफ्ट्स, 4 स्टँडर्ड रूम्स, मल्टीक्युझिन रेस्टॉरंट, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान तसेच घोडेस्वारी आणि जीपने जंगल राईड यांसारख्या सुविधा आहेत. याशिवाय नॉन एसी लॉफ्ट, बंगला आणि आहेत.

मिथुन चक्रवर्तींचे मुंबईत दोन बंगले आहेत. याशिवाय त्यांना कुत्र्यांचाही शौक आहे. त्यांच्याकडे एक-दोन नव्हे तर 76 कुत्रे आहेत. मिथुन त्यांच्या देखभालीवर खूप खर्च करतात.