'सैराट' फेम तानाजी गळगुंडेने पहिल्यांदाच शेअर केला पत्नी अन् मुलासोबतचा फोटो, लेकाचं नाव काय ठेवलंय माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 11:03 IST2026-05-19T10:49:17+5:302026-05-19T11:03:45+5:30

'सैराट' मधील परशाचा मित्र लंगड्याच्या पत्नी अन् मुलाला पाहिलंत का? पहिल्यांदाच शेअर केले फोटो, चाहते म्हणाले-"जगात भारी जोडी...",

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला. या चित्रपटाला सिनेरसिकांनी अक्षरश डोक्यावर उचलून धरलं होतं.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन १० वर्ष पूर्ण झाली असली तरी त्यातील पात्रांची जादू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

दरम्यान,या चित्रपटात लंगड्याची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता तानाजी गालगुंडे सध्या चर्चेत आला आहे.

तानाजीने वैयक्तिक आयुष्यात २०२४ मध्ये गर्लफ्रेंड प्रतीक्षा शेट्टीसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०२५ मध्ये या दाम्पत्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं.

तानाजी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत नसला तरी प्रतीक्षा मात्र अपडेट्स देत असते.मात्र, आता स्वत तानाजीने सोशल मीडियावर त्याची पत्नी आणि मुलाबरोबरचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

याशिवाय तानाजीने मुलाचं नाव देखील सांगितलं आहे. या फोटोंमध्ये तानाजी पत्नी प्रतीक्षाच्या खांद्यावर हात ठेऊन उभा आहे. तर प्रतीक्षाने त्यांच्या क्यूट लेकाला कडेवर घेतलंय.#MummyPapa, #Samyak असं म्हणत तानाजीने मुलांचं नाव जाहीर केलं आहे. दरम्यान, अभिनेत्याचे हे फोटो पाहून चाहत्यांनी त्याच्या त्रिकोणी कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव केला आहे."जगात भारी जोडी...", "जाळ अन् धुर संगटच केला", अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या फोटोंवर केल्या आहेत.

तानाजी गलगुंडेची पत्नी प्रतीक्षा शेट्टी एक मॉडेल आणि उद्योजिका आहे. त्याच्या ऑपरेशनच्या काळात तिने त्याची विशेष काळजी घेतली होती. प्रतीक्षा वेगळ्या जातीमधली असल्यामुळे सुरुवातीला तानाजीच्या आईने त्यांच्या नात्याला विरोध केला होता. मात्र, कालांतराने तानाजीने आपल्या आईला समजावून सांगितल्यानंतर त्यांनी त्यांचे नाते स्वीकारले होते. त्याने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं.