"एकच किसिंग सीन होता पण तरी तो मला किस करत राहिला...", प्रिया बापटने सांगितला हिंदी सिनेमाच्या शूटचा शॉकिंग अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 15:25 IST2026-05-18T15:21:37+5:302026-05-18T15:25:39+5:30
पहिल्याच हिंदी सिनेमाच्या सेटवर प्रियाला वाईट अनुभव आला होता. हिंदी सिनेमाच्या सेटवर प्रियाला सहकलाकाराकडून चुकीची वागणूक मिळाली होती.

प्रिया बापटने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही नाव कमावलं. अनेक हिंदी सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. पहिल्याच हिंदी सिनेमाच्या सेटवर प्रियाला वाईट अनुभव आला होता.

प्रियाने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच हा अनुभव सांगितला. हिंदी सिनेमाच्या सेटवर प्रियाला सहकलाकाराकडून चुकीची वागणूक मिळाली होती.

प्रिया म्हणाली, "मराठी इंडस्ट्रीत मला असा अनुभव आला नाही. पण, पहिल्याच हिंदी सिनेमाच्या शूटिंग करत असताना माझ्यासोबत विचित्र प्रकार घडला. पण मी त्या अभिनेत्याचं नाव घेणार नाही".

"त्या सिनेमात फक्त एकच किसिंग सीन होता. पण मला त्या सीनचीही गरज वाटत नव्हती. पण, मी दिग्दर्शकामुळे मी तो सीन करण्यासाठी तयार झाले होते".

"मी एकाच किसिंग सीनसाठी होकार दिला होता. पण त्यानंतरही सिनेमात असे काही क्षण होते तिथे माझा सहअभिनेता मला किस करत राहिला".

"मला त्यावेळी स्वत:साठी ठाम भूमिका घेता आली नाही. कारण मला माहीत नव्हतं की मी काय करायला हवं".

"आम्ही एकाच हॉटेलमध्ये पण वेगळ्या रुम्समध्ये राहत होतो. तो मला मेसेज करायचा की आपण डिनरला जाऊया. तू इकडे ये मी तुला स्विमिंग शिकवतो".

"मी त्याला म्हटलं की मला यातलं काहीही नको. असं माझ्यासोबत यापूर्वी कधीच घडलेलं नव्हतं आणि घडूही नये", असं प्रियाने सांगितलं.
















