तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी! 'निवडुंग' फेम अर्चना जोगळेकर आता दिसतात अशा, परदेशात राहून करतात 'हे' काम
By देवेंद्र जाधव | Updated: January 22, 2026 17:23 IST2026-01-22T17:06:52+5:302026-01-22T17:23:50+5:30
निवडुंग सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अर्चना जोगळेकर आता अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. त्या आता परदेशात स्थायिक असून तिथे खास गोष्ट करत आहेत

'निवडुंग' हा १९८९ साली आलेला सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात रविंद्र मंकणी आणि अर्चना जोगळेकर यांच्या जोडीने प्रेक्षकांचं मन जिंकलं.

अर्चना जोगळेकर यांनी या सिनेमात चित्रा नावाच्या इंडस्ट्रीत अभिनेत्री होण्याचं स्वप्न मनात बाळगलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. अर्चना आता मात्र अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेऊन परदेशात स्थायिक आहेत

अर्चना जोगळेकर सोशल मीडिया सक्रीय असून त्या त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत असतात. अर्चना जोगळेकर या अभिनयासोबत उत्तम डान्सरही आहेत

अर्चना जोगळेकर या लग्नानंतर परदेशात स्थायिक झाल्या. त्यामुळे त्या अभिनय क्षेत्रापासून आता दूर आहेत. अर्चना या प्रसिद्ध कथ्थक डान्सर आहेत.

परदेशात येणारे मराठी कलाकार आवर्जुन अर्चना यांची भेट घेतात. अर्चना सुद्धा इंडस्ट्रीतील मित्रांचं चांगलंच आदरातिथ्य करतात.

त्या आता परदेशात कथ्थक डान्सच्या बॅचेस घेऊन तिथल्या लोकांना शास्त्रीय नृत्याचे धडे देतात. त्यामुळे अभिनय क्षेत्रापासून दूर असल्या तरीही अर्चना नृत्याच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत

अशाप्रकारे तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी या गाण्याच्या ओळी अर्चना यांच्या वैयक्तिक आयुष्यालाही लागू होत आहेत. वय वाढलं असलं तरी अर्चना यांच्या मनात असलेलं कलेचं प्रेम तसंच आहे

















