'मुळशी पॅटर्न' मधली 'चहावाली' आठवतेय? आता दिसते फारच सुंदर, ८ वर्षात इतका बदलला अभिनेत्रीचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:10 IST2026-05-14T12:57:40+5:302026-05-14T13:10:24+5:30

अभिनयासह शिक्षणातही आहे अव्वल! 'मुळशी पॅटर्न'मधली 'चहावाली' आठवतेय? आता दिसते भलतीच ग्लॅमरस

हा चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने बघतात. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील प्रत्येक भूमिका गाजली होती.

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात राहुल्याच्या मैत्रिणीची भूमिका अभिनेत्री मालविका गायकवाडने साकारली होती. आपल्या या छोट्याशा भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी ठरली.

मालविका ही आयटी इंजिनीअर आहे.मालविकानं २०२० मध्ये सिद्धार्थ सिंघवीसोबत आपली लग्नगाठ बांधली.मालविका जगातील प्रतिष्ठित अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाली आहे.

काही दिवस आयटी सेक्टरमधील ग्लॅमर, पैसा तिला बरा वाटला. पण हळूहळू तिची घुसमट सुरू झाली.त्यानंतर मालविका उद्योग क्षेत्रात उतरली.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शार्क टँक शोमध्ये देखील तिने हजेरी लावली होती. आता आपल्या मेहनत आणि हुशारीच्या जोरावर ती नाव कमवत आहे.

मालविका सध्या सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. त्याद्वारे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. ‘मुळशी पॅटर्न’ दिसणारी साधी मुलगी खऱ्या आयुष्यात भलतीच सुंदर दिसते.