'निशाणा तुला दिसला ना' गाण्यातील मराठी अभिनेत्री आठवतेय? आज आहे हिंदीतील लोकप्रिय चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 17:03 IST2026-05-05T16:53:12+5:302026-05-05T17:03:19+5:30

१९८४ साली आलेल्या 'नवरी मिळे नवऱ्याला' सिनेमा खूप गाजला. याच सिनेमातील निशाणा तुला दिसला ना हे गाणंही प्रचंड लोकप्रिय झालं. आजही हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल आहे. या गाण्यातील मराठी अभिनेत्री सध्या हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे.

१९८४ साली आलेल्या 'नवरी मिळे नवऱ्याला' सिनेमा खूप गाजला. याच सिनेमातील निशाणा तुला दिसला ना हे गाणंही प्रचंड लोकप्रिय झालं. आजही हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल आहे. या गाण्यातील मराठी अभिनेत्री सध्या हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे.

या मराठी अभिनेत्रीचं नाव आहे नीलिमा परांडेकर. नीलिमा यांनी अभिनेत्री म्हणून हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतून सुरुवात केली असली तरी 'नवरी मिळे नवऱ्याला' सिनेमातून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.

'नवरी मिळे नवऱ्याला' सिनेमात नीलिमा परांडेकर यांचा अशोक सराफ यांच्यासोबतचा डान्स चांगलाच गाजला. निशाणा तुला दिसला ना गाण्यात अशोक आणि नीलिमा यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली.

नीलिमा परांडेकर यांनी १९८४ सालच्या माहेरची माणसे या चित्रपटातही काम केले होते.परंतु नंतर त्या हिंदीच्या छोट्या पडद्याकडे वळल्या. शॉर्टकट रोमिओ, एक घर बनाउंगा, बिट्टी बीजनेसवाली, ढुंढ लेगी मंजिल हमें अशा हिंदी मालिकेतून त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.

एक घर बनाउंगा या मालिकेत त्यांनी साकारलेली मंगलादेवी शशिकांत गर्गची भूमिका खूपच हिट ठरली होती. एकूणच मराठीत सक्रीय नसल्या तरीही नीलिमा परांडेकर यांनी हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला.

नीलिमा परांडेकर यांनी 'नवरी मिळे नवऱ्याला' रश्मी भाऊराव देशमुख ही भूमिका साकारलेली. नीलिमा यांची ही भूमिका आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे

'नवरी मिळे नवऱ्याला' सिनेमाला रिलीज होऊन आता ४२ वर्ष झाली आहेत. या काळात नीलिमा यांच्यातही बदल झाला असून त्यांना ओळखता येणंही कठीण झालं आहे.