कलाविश्वापासून कोसो दूर आहे उपेंद्र लिमयेची पत्नी; जनसेवेसाठी करतीये 'या' क्षेत्रात काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 03:17 PM2022-03-15T15:17:55+5:302022-03-15T15:21:50+5:30

Upendra limaye: उपेंद्र लिमये मुळचा पुण्याचा असून त्याच्या फिल्मी करिअरविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे.

रांगडा स्वभाव, जबरदस्त अभिनयशैली यामुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता म्हणजे उपेंद्र लिमये.

जोगवा, मुळशी पॅटर्न, सावरखेड एक गाव, कोकणस्थ अशा कितीतरी चित्रपटांमध्ये उपेंद्र झळकला आहे.

मराठी कलाविश्वाप्रमाणेच त्याने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

उपेंद्रचा कलाविश्वात जरी सक्रीय वावर असला तरीदेखील सोशल मीडियावर तो फारसा सक्रीय नाही.

उपेंद्र लिमये मुळचा पुण्याचा असून त्याच्या फिल्मी करिअरविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे.

उपेंद्र लिमयेचं लग्न झालं असून त्याला भैरवी आणि वेद अशी दोन मुलं देखील आहेत.

उपेंद्रच्या पत्नीचं नाव स्वाती लिमये आहे.

स्वाती कलाविश्वापासून दूर आहे. मात्र, ती समाजसेवेसाठी काम करते. स्वाती एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे.