मराठीतला 'चॉकलेट बॉय' ललित प्रभाकरचं आडनाव माहितीये का? धुळ्याशी आहे कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:52 IST2026-04-15T15:18:12+5:302026-04-15T15:52:15+5:30
तरुणींचा क्रश ललित प्रभाकरचं आडनाव आहे तरी काय?

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता ललित प्रभाकर

२०१३ साली आलेल्या'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून ललित प्रभाकर घराघरात पोहोचला. तेव्हापासून प्रेक्षक त्याला 'ललित प्रभाकर' याच नावाने ओळखतात.

ललित आपल्या नावापुढे नेहमी 'प्रभाकर' लावतो. मात्र, हे त्याचे आडनाव नसून त्याच्या वडिलांचे नाव आहे. तो आपल्या नावापुढे आडनाव लावणं टाळतो. मग ललितचं आडनाव आहे तरी काय?

ललितचा जन्म १२ सप्टेंबर १९८७ रोजी कल्याणमध्ये झाला. त्याचे मूळ गाव धुळे जिल्ह्यातील सामोडे आहे.

ललितने B.Sc Computer Science मध्ये पदवी मिळवली आहे. त्याचे शालेय शिक्षण पालघरमधील जवाहर नवोदय विद्यालयातून झाले आहे.

ललितचे वडील प्राध्यापक आणि आई शिक्षिका होती. ललितने कल्याणमधील 'मिते-चार' या नाट्यसंस्थेतून आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू केला.

ललित प्रभाकरचं पूर्ण नाव 'ललित प्रभाकर भदाणे' असं आहे. धुळ्याचे 'भदाणे' हे आडनाव खान्देशात प्रसिद्ध आहे.

ललित प्रभाकर नुकताच 'सुपर डुपर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याच्या आगामी 'ढसाळ' सिनेमाची घोषणा झाली आहे. याशिवाय ललित हिंदीतही नशीब आजमावत आहे.

















