Photos: जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनीही आहे अभिनेत्री, 'या' सिनेमात बापलेकीने एकत्र केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 16:10 IST2026-05-15T16:06:17+5:302026-05-15T16:10:52+5:30
जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनीही अभिनेत्री आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तिने अभिनय क्षेत्र निवडलं.

९०चं दशक गाजवलेले अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. स्वामिनीने मल्याळी बॉयफ्रेंड वरुण नायरसोबत लग्न करत संसार थाटला आहे.

स्वामिनीच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकारांनीही हजेरी लावली होती. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

स्वामिनी आणि वरुण यांनी दाक्षिणात्य आणि मराठी अशा दोन्ही पद्धतीने लग्न करत सप्तपदी घेतले.

जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनीही अभिनेत्री आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तिने अभिनय क्षेत्र निवडलं.

'एफयू' या सिनेमातून तिने पदार्पण केलं होतं. 'ये है आशिकी'मध्येही ती झळकली होती.

प्लॅनेट मराठीवरील 'बाबा' या सिनेमात जयवंत वाडकर आणि स्वामिनी ही बापलेकीची जोडी दिसली होती.

स्वामिनीने सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. तिला डान्सचीही आवड आहे.

स्वामिनी एक बेली डान्सर आहे. ती अनेकदा तिचे हॉट फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

स्वामिनीचा नवराही कलाविश्वात सक्रिय असून तो एक निर्माता आहे.

















