जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का?, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 01:19 PM2021-09-08T13:19:41+5:302021-09-08T13:30:58+5:30

अभिनेते जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

अभिनेते जयवंत वाडकर यांची कन्या स्वामिनी वाडकर हिनेदेखील वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्याचे ठरवले आहे.

स्वामिनीने महेश मांजरेकरांच्या 'एफ यू' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केेले होते.

तसेच सचिन पिळगावकर यांच्या 'ये है आशिकी' या चित्रपटात तिने काम केले होते.

स्वामिनी सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते.

स्वामिनी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी आणि स्वामिनी या बेस्ट फ्रेंड आहेत.

दोघींच्याही सोशल मीडिया अकाउंटवर त्यांची एकमेकींसोबतची अनेक फोटो पहायला मिळतात.

स्वामिनी उत्तम बेली डान्सरदेखील आहे.

स्वामिनीचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.