काळ्या रंगाच्या साडीत अमृता खानविलकरने केले फोटोशूट, दिसली झक्कास!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 08:44 PM2021-08-06T20:44:58+5:302021-08-06T20:53:00+5:30

अमृता खानविलकरच्या लेटेस्ट फोटोशूटला मिळतेय चाहत्यांची पसंती

अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटविला आहे.

अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.

अमृता सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचदा चाहत्यांशी संवाद साधते आणि फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

अमृता खानविलकरने नुकतेच काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.

अमृताच्या काळ्या रंगाच्या साडीतील फोटोंना पसंती मिळते आहे.

अमृता खानविलकरच्या या फोटोंवर कमेंट्स वर्षाव होतो आहे.

अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती चोरीचा मामला या चित्रपटात झळकली होती. (Photo Instagram)

अमृता खानविलकर पाँडिचेरी चित्रपटात दिसणार आहे.