'बिग बॉस मराठी'फेम अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट; हॉटनेसमुळे ओळखणंही झालं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 05:08 PM2022-07-31T17:08:26+5:302022-07-31T17:11:45+5:30

Heena panchal: हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केले आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे.

'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हिना पांचाळ.

बिग बॉसमुळे हिना लोकप्रिय झाली. मात्र, या शो नंतर फारशी कोणत्याही मराठी कार्यक्रमांमध्ये झळकली नाही.

हिना कलाविश्वात फारशी सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे.

अलिकडेच हिनाने एक फोटोशूट केलं असून यात ती प्रचंड बोल्ड दिसत आहे.

हिनाने या फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या नव्या लूकमध्ये हिनाला ओळखणंही कठीण झालं आहे.

हिना पांचाळने २०१४ साली तिचं फिल्मी करिअर सुरू केलं. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केले आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे.

हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली होती.