Hera Pheri Rinku: कुठे आहे देवीप्रसादची नात रिंकू? ‘हेरा फेरी’नंतर 23 वर्षांत इतकी बदलली...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 08:00 AM2023-02-24T08:00:00+5:302023-02-24T08:00:01+5:30

Hera Pheri Rinku: ‘हेरा फेरी’ हा सिनेमा 2000 मध्ये रिलीज झाला होता. 2006मध्ये याचा दुसरा पार्ट आला. आता तिसरा पार्ट येतोय. राजू, श्याम, बाबू भैय्या सर्वांचीच प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण रिंकूचं काय?

‘हेरा फेरी’ हा सिनेमा रिलीज होऊन 20 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. पण आजही या सिनेमातील प्रत्येक पात्र लोकांच्या मनात जिवंत आहे. आता ‘हेरा फेरी 3’ येतोय.

‘हेरा फेरी 3’मध्ये अक्षय कुमारची एन्ट्री झाल्याची बातमी कन्फर्म झाल्यापासून चाहते क्रेझी झाले आहेत. सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘हेरा फेरी’ हा सिनेमा 2000 मध्ये रिलीज झाला होता. 2006मध्ये याचा दुसरा पार्ट आला. आता तिसरा पार्ट येतोय. राजू, श्याम, बाबू भैय्या सर्वांचीच प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण रिंकूचं काय?

होय, अक्षय कुमार,तब्बू, सुनील शेट्टी, परेश रावल यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘हेरा फेरी’ सिनेमातला चिमुकला चेहराही तुम्हाला आठवत असेलच. होय,आम्ही बोलतोय ते देवीप्रसादची नात रिंकूबद्दल.

या रिंकूचे अपहरण होते. कबीरा तिला किडनॅप करतो आणि रिंकू हवी असेल तर पैशाची मागणी करत देवीप्रसादला फोन करतो. पण फोन लागतो बाबूरावला आणि इथूनच सुरु होते हेराफेरी.

सिनेमात रिंकूची भूमिका साकारणाऱ्या चिमुकलीचे नाव होते एलेक्सिया एनरा. ही एलेक्सिया आता बरीच मोठी झाली आहे.

हेराफेरीमधील ही चिमुकली आता चांगलीच ग्लॅमरस व हॉट दिसते. 3 वर्षांची असतानापासून एलेक्सिया मॉडेलिंग करतेय. पण सिनेमातील तिचा प्रवास थांबलाय. आताश: तिने ॲक्टिंगला कायमचा रामराम ठोकलाय.

एलेक्सियाने सिनेमे करू नयेत, अशी आईवडिलांची इच्छा होती. मॉडेलिंग आणि जाहिरातीसाठी त्यांचा होकार होता. पण मुलीने सिनेमात काम करण्यास त्यांचा विरोध होता.

हेराफेरी या सिनेमातही केवळ उन्हाळ्याच्या सुट्टीत शूट होते म्हणून मम्मीपापाने एलेक्सियाला काम करण्याची परवानगी दिली गेली होती.‘हेरा फेरी’ या चित्रपटानंतर एलेक्सिया एकाही चित्रपटात दिसली नाही.

एलेक्सिया आता काय करते तर Wasted Solutions नावाने बिझनेस चालवते. बेस्ट मॅनेजमेंट हा तिच्या बिझनेसचा मुख्य उद्देश आहे.

एलेक्सिया ग्रॅज्युएट आहे आणि एका सॉफ्टवेअर कंपनीत काही काळ तिने नोकरीही केली. आता तिचा ॲक्टिंगमध्ये परतण्याचा कुठलाही इरादा नाही.