Animalफेम बॉबीचा भाऊ आहे ॲक्टिंग कोच; तृप्ति डिमरीने त्याच्याकडेच गिरवलेत अभिनयाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 11:13 AM2023-12-15T11:13:28+5:302023-12-15T11:27:44+5:30

Saurabh sachdeva: सौरभने वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस, वाणी कपूर, अर्जुर कपूर अशा कितीतरी कलाकारांना घडवलं आहे.

सध्या रणबीर कपूरचा animal हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे या सिनेमातील प्रत्येक कलाकार नेटकऱ्यांमध्ये चर्चेत येत आहे.

७५६ कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या सिनेमात रणबीरशिवाय, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी, उपेंद्र लिमये हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

सध्या नेटकऱ्यांमध्ये या सिनेमातील बॉबीच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. अभिनेता सौरभ सचदेव याने या सिनेमात आबिद उल हक ही भूमिका साकारली आहे.

आबिद उल हक ही भूमिका साकारणारा सौरभ खऱ्या आयुष्यात अॅक्टिंग कोच आहे. आजवर त्याने अनेक कलाकार घडवले आहेत.

सौरभने २००१ मध्ये उत्तराखंडमध्ये बॅरी जॉन यांचं इमेजो अॅक्टिंग स्कूल जॉइन केलं होतं. त्यानंतर त्याने याच अॅक्टिंग स्कूलमध्ये शिक्षण देण्यास सुरुवात केली.

२००५ मध्ये त्याने मुंबई गाठली. येथे आल्यावर त्याने बॅरी जॉन अॅक्टिंग स्कूलमध्ये अभिनय शिकवण्यास सुरुवात केली. ११ वर्ष याच संस्थेत अभिनय शिकवण्याचं काम त्याने केलं.

सौरभने मनमर्जिया, हाऊसफुल ४ या सिनेमात काम केलं आहे. तसंच सेक्रेड गेम्स, काला, बंबई मेरी जान या वेबसीरिजमध्येही तो झळकला आहे.

सीक्रेड गेम्समध्ये सौरभने सुलेमान ईसाची भूमिका साकारली होती.

विशेष म्हणजे animal मधील भूमिकेसाठी तृप्ति डिमरीचं कौतुक केलं जात आहे. या तृप्तिला सौरभनेच अभिनय शिकवला आहे.

सौरभने वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस, वाणी कपूर, अर्जुर कपूर, ऋचा चड्ढा, कुब्रा सैत, दुलकर सलमान, आशा नेगी, ऋत्विक धनजानी, शक्ती मोहन अशा कितीतरी कलाकारांना अभिनयाचे धडे दिले आहेत.