मेघा धाडे ते इलियाना डीक्रुज लग्नाआधीच गरोदर राहिल्या या प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 10:39 AM2023-06-14T10:39:52+5:302023-06-14T11:14:27+5:30

सिनेइंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधीच गरोदर झाल्या. काहींनी प्रेग्रेंसी लपवून ठेवली तर काहींनी घाईघाईत लग्न उरकलं.

मेघा धाडे बिग बॉस फेम अभिनेत्री मेघा धाडेसुद्धा लग्नाआधीच गर्भवती होती. तर पाच महिने उलटून गेल्यानंतर मेघाला ती प्रेग्नेंट असल्याचे समजले होते. यामुळे मेघासह तिच्या कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला होता. आईवडील, भाऊ, समाजाच्या विरोधात जाऊन मुलीला जन्म दिल्याचे मेघाने सांगितले. मेघाच्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकून तिच्या वडिलांचा चार महिन्यातच मृत्यू झाला होता. (फोटो इन्स्टाग्राम)

त्यानंतर मेघा तीन वर्षे एका अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण दोघांचही पटत नव्हतं. त्यानंतर तिने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. मेघाने बिग बॉसच्या घरात तिच्या पतीचा उल्लेख करताना सांगितले होते, 'लहान वयात माझ्या हातून काही चुका घडल्या होत्या. लग्नाच्या आधीच मी आई झाल्यानंतर माझं आयुष्य खूपच खडतर होत गेलं. या सर्व घटनेमुळं घरच्यांनी देखील मला लांब केलं होतं.' आता मेघाने आदित्य पावसकर याच्याशी विवाह केला असून त्याने तिच्या मुलीचाही स्वीकार केलाय. (फोटो इन्स्टाग्राम)

नेहा धुपिया- बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाला कोणत्याही परिचयाची गरज आहे. नेहासुद्धा लग्नाच्या आधीच गरोदर राहिली होती. याचा खुलासा तिने स्वतःच केला होता. नेहाने २०१८ साली अभिनेता अंगद बेदीशी विवाह केला. पण लग्नापूर्वी नेहा आणि आणि अंगद अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. याचदरम्यान नेहा गर्भवती राहिली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

पण मुलीच्या जन्माच्या काही महिने अगोदर नेहा आणि अंगद यांनी लगबगीने लग्न केलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने सांगितलं होतं या दरम्यान तिला तिच्या कुटुंबियांचाही पाठिंबा मिळाला.

इलियाना डीक्रुज बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डीक्रुजसुद्धा लग्नापूर्वीच गर्भवती आहे. सध्या ती तिचा प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करतेय. काहीआठवड्यांपूर्वीच तिने तिच्या प्रेग्नंसीविषयी सोशल मीडियावरून माहिती दिली होती. इलियाना तिच्या बॉयफ्रेंडचा ब्लरसा फोटोसुद्धा अलिकडेच शेअर केला होता, पण त्याच्या नावाचा अद्याप खुलासा केलेला नाही. (फोटो इन्स्टाग्राम)

कल्की कोच्लिन बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोच्लिन सुद्धा लग्नापूर्वीच आई झाली आहे. कल्कीने प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्पशी विवाह केला होता. पण लग्नाच्या काहीच वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर कल्कीने लग्न केलंच नाही.

पण २०१९ मध्ये तिने ती गर्भवती असल्याचं जाहीर केलं. तर २०२० मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. कल्की गाय हर्शबर्ग याला डेट करतेय. हर्शबर्ग हा एक इस्त्राइल बेस संगितकार आहे. सोशल मीडियावर नेहमीच त्यांचे गोड फोटोस मुलीसोबत पाहायला मिळतात. दोघंही लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात.

गॅब्रिएला डेमिट्रिएड् बॉलिवूड अभिनेता अर्जून रामपालची गर्लफ्रेंड मॉडेल गॅब्रिएलासुद्धा लग्नाआधीच आई झाली आहे. 2019 साली अर्जूनने त्याची पत्नी मेहर जेसिया सोबत घटस्फोट घेतला होता. अर्जून आणि मेहर दोघांनाही २ मोठ्या मुली आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

तर २०१९ सालीच ग्रॅबिएला आणि अर्जुनने ते आईबाबा होणार असल्याचं जाहीर केलं होतं. ग्रॅब्रिएलाने जुलै २०१९ मध्ये एका मुलाला जन्म दिला. तर आता पुन्हा एकदा ती आई होणार आहे. मात्र दोघांनीही अद्याप लग्न केलेलं नाही.(फोटो इन्स्टाग्राम)

महिमा चौधरी परदेस या चित्रपटातून खऱ्या अर्थाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. त्याकाळी महिमाच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी चर्चेत आल्या होत्या. महिमादेखील लग्नापूर्वी प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जातं. २००६ मध्ये तिने गुपचूपपणे लग्न केलं आणि लग्नाच्या काही महिन्यातच तिच्या पहिल्या लेकीला जन्म दिला. (फोटो इन्स्टाग्राम)

नीना गुप्ता बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्तासुद्धा लग्नापूर्वीच आई बनल्या. 80 च्या दशकात अभिनेत्री नीना गुप्ता या वेस्ट इंडिजचा प्रसिद्ध क्रिकेट विवियन रिचर्डच्या प्रेमात होत्या. तर याच दरम्यान त्या गर्भवती राहिल्या. पण विवियन आधीच विवाहित असल्याने ते नीना यांच्याशी लग्न करू शकत नव्हते. त्यामुळे नीना यांनी अविवाहित असतानाच मुलीला जन्म दिला. त्यांची मुलगी मसाबा गुप्तासुद्धा प्रसिद्ध डिझायनर आहे.