'आशिक बनाया आपने'मधील इमरानसोबतच्या किसींग सीनबाबत १८ वर्षांनी तनुश्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "सीन शूट करताना..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 03:07 PM2023-12-09T15:07:37+5:302023-12-09T15:15:49+5:30

'आशिक बनाया आपने'मधील किसींग सीनवर तनुश्रीचं मोठं वक्तव्य, म्हणाली, "इमरान हाशमी किसर बॉय, पण..."

२००५ साली प्रदर्शित झालेल्या 'आशिक बनाया आपने' या सिनेमातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. या सिनेमातील इमरान हाशमी आणि तनुश्री दत्ताची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती.

'आशिक बनाया आपने'मधील इमरान-तनुश्रीच्या रोमँटिक सीन्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या सिनेमातील त्यांच्या किसींग सीनचीही प्रचंड चर्चा रंगली होती.

आता १८ वर्षांनी इमरान हाशमीबरोबरच्या किसींग सीनबाबत तनुश्रीने मौन सोडलं आहे. फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने याबाबत भाष्य केलं आहे.

तनुश्री म्हणाली, "पहिल्या दिवसापासून इमरान हाशमी माझ्यासाठी केवळ अभिनेता होता. मी त्याच्याबरोबर तीन चित्रपट केले आहेत."

"आम्ही चॉकलेटमध्येही एक किसींग सीन शूट केला होता. पण, तो चित्रपटातून काढून टाकण्यात आला होता."

"पहिल्या वेळेस किसींग सीन शूट करताना खूप विचित्र वाटलं होतं. कारण, वास्तविक पाहता आमच्यात केमिस्ट्री नव्हती. पण , दुसऱ्या वेळेला मला थोडं कमी विचित्र वाटलं"

"त्याची किसर बॉय अशी इमेज आहे. पण, तो सहज किस करू शकत नाही. आणि अर्थात मीदेखील नाही."

तनुश्री दत्ताने २००५ साली 'आशिक बनाया आपने'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती रकीब, ढोल, सास बहू और सक्सेस यांसारख्या चित्रपटात झळकली.

इमरान हाशमी आणि तनुश्री ही जोडी 'चॉकलेट : डीप डार्क सीक्रेट्स', 'गुड बॉय बॅड बॉय' आणि 'आशिक बनाया आपने' या सिनेमांत दिसली होती.