कोण आहे Ashu Reddy? जिच्या पायला kiss करताना दिसले Ram Gopal Varma, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 10:53 AM2022-12-09T10:53:33+5:302022-12-09T11:11:52+5:30

व्हिडीओमध्ये राम गोपाल वर्मा अभिनेत्रीच्या पायाचे चुंबन घेताना दिसत आहे. नेटकऱ्यांना RGVचे वर्तन खूप विचित्र वाटत आहे.

Ram Gopal Varma Video: चित्रपट दिग्दर्शक/निर्माते राम गोपाल वर्मा नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे किंवा विचित्र कृत्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या एका विचित्र कृत्यासाठी चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री आणि बिग बॉसची एक्स स्पर्धक आशु रेड्डीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ते तिच्या पायांची पप्पी घेताना दिसत आहेत.

अलिकडेच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राम गोपाल वर्मा होस्ट आशु रेड्डीच्या शो हॅप्पी डेजमध्ये गेले होतं. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये राम गोपाल वर्मा अभिनेत्रीच्या पायाचे चुंबन घेताना दिसत आहे. नेटकऱ्यांना RGVचे वर्तन खूप विचित्र वाटत आहे.

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर नेटिझन्स दिग्दर्शकाला ट्रोल करत आहेत. हा व्यक्ती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणत्याही थराला जातो, असे एकाने म्हटले.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांना जाणून घ्यायचे आहे की कोण आहे हा आशु रेड्डी?

अभिनेत्री असण्यासोबतच आशु एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसरदेखील आहे. आशु रेड्डीने तेलुगु फिल्म इंडस्ट्रीत काम केले आहे.

आशु रेड्डीने 2018 साली 'चल मोहन रंगा' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

2019 मध्ये, आशु बिग बॉस तेलुगु सीझन 3 च्या स्पर्धकांपैकी एक होता. हा रिअ‍ॅलिटी शो नागार्जुनने होस्ट केला होता.