एकेकाळी ५०० रुपये कमावणारा डॉ. गुलाटी आहे कोट्यधीश; सुनील ग्रोवरचं नेटवर्थ पाहून होतील डोळे पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 10:50 AM2022-08-03T10:50:37+5:302022-08-03T10:55:53+5:30

Sunil grover: 'भारत', बागी या बॉलिवूड चित्रपटांमध्ये तर तांडव या वेब सीरिजमध्ये सुनील झळकला आहे. त्यामुळे दिवसागणिक त्याचं मानधनदेखील वाढताना दिसतं.

प्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेता सुनील ग्रोवर सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. आज सुनीलचा वाढदिवस त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये त्याच्याविषयीची चर्चा होताना दिसते.

डॉक्टर महशूर गुलाटी आणि गुत्थी या भूमिकांमुळे सुनील विशेष लोकप्रिय झाला.

विनोदाचं अचूक टायमिंग साधणाऱ्या सुनीलने कॉमेडी शो सोबतच काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

छोटा पडदा, रुपेरी पडदा आणि ओटीटीवर झळकलेला सुनील आज लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो.

कायम चर्चेत असणारा सुनील खऱ्या आयुष्यात प्रचंड साधा राहत असला तरीदेखील त्याची एकूण संपत्ती थक्क करणारी आहे.

हरियाणातील मध्यमवर्गीय कुटुंबात सुनीलचा जन्म झाला असून त्याचे वडील बँक मॅनेजर होते. सुनीलला एक मोठी बहीण आणि लहान भाऊ आहे.

भारत, बागी या बॉलिवूड चित्रपटांमध्ये तर तांडव या वेब सीरिजमध्ये सुनील झळकला आहे. त्यामुळे दिवसागणिक त्याचं मानधनदेखील वाढताना दिसतं.

५०० रुपयांपासून करिअरची सुरुवात करणारा सुनील आज एका एपिसोडसाठी १० ते १२ लाख रुपये चार्ज करतो.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील एका चित्रपटासाठी ५० लाख रुपये फी घेतो. त्यामुळे त्याचं एकूण नेटवर्थ १८ कोटी रुपये आहे.

सुनीलचं मुंबईमध्ये आलिशान घरदेखील आहे.