सुपरस्टार ममूटीकडे एक-दोन नाही तर आहेत तब्बल 369 अलिशान गाड्या, आहे इतक्या कोटींचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 11:40 AM2020-09-07T11:40:02+5:302020-09-07T11:52:42+5:30

मल्याळम आणि तमीळ चित्रपटांतील सुपरस्टार ममूटी यांचा आज वाढदिवस.

मल्याळम आणि तमीळ चित्रपटांतील सुपरस्टार ममूटी यांचा आज वाढदिवस. आज ते 69 वर्षांचे झालेत.

सुपरस्टार ममूटी यांचा जन्म 7 सप्टेंबर 1951 ला कोची येथे झाला होता. ममूटी हे नाव त्यांनी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी ठेवले.

ममूटी यांचे खरे नाव मुहम्मद कुट्टी पनिपरमबिल इस्माइल असून त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ममूटी यांना गाड्यांचे प्रचंड वेड आहे.

ममूटी यांच्याकडे 10-15 नाही तर तब्बल 369 अलिशान महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

काही वर्षांपूर्वी ममूटी यांनी देशातील पहिली मारूती 800 कार खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी आपल्या कारसाठी वेगळे गॅरेज बनवले आहे. स्वत: गाडी चालवणे त्यांना अधिक आवडते.

पहिली आॅडी खरेदी करणारे साऊथचे ते पहिले स्टार मानले जातात.

त्यांची पहिली कार होती मारूती. त्यांच्या 369 गाड्यांच्या ताफ्यात आजही मारूतीचे तीन मॉडेल आहेत.

त्यांच्या बहुतेक गाड्यांचा नंबरमध्ये 369 हा नंबर आहे.

त्यांच्या एकदंरीत सगळ्या गाड्यांची किंमत ही १०० कोटीहून देखील अधिक आहे.

ममूटींच्या कुटुंबाबद्दल सांगायचे तर 1979 साली त्यांनी सुलफतसोबत लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. मुलगा दुलकीर सलमान आणि मुलगी कुट्टी सुरूमी. दुलकीर सलमान साऊथचा मोठा व लोकप्रिय अभिनेता आहे.

ममूटी यांनी सत्तरीच्या दशकापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आजवर 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

थीरम तेंदुन्ना थीरा, रुग्मा, कोट्टायम कुंजाचान, कनलकट्टू, सागरम साक्षी, मिशन 90 डेज असे त्यांचे आजवर अनेक चित्रपट गाजले आहेत.

ममूटी यांच्याकडे जवळपास 200 कोटीहून अधिकची संपत्ती आहे. ममुटी दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सुपरस्टार असल्याने ते एका चित्रपटासाठी जवळजवळ तीन ते साडे तीन कोटी घेतात.

ममूटी आपल्या कुटुंबियांसमवेत कोच्ची येथील जोसेफ रोड या परिसरात राहातात. त्यांचे येथील घर भलेमोठे असून हे घर त्यांनी करोडोमध्ये खरेदी केले होते.

Read in English

टॅग्स :ममूटीMammootty