'जयेशभाई जोरदार': रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; अर्जुन रेड्डीमध्येही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 02:04 PM2022-04-19T14:04:51+5:302022-04-19T14:10:55+5:30

Shalini pandey: शालिनी साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री असून ती अर्जुन रेड्डीमध्ये झळकली आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याची मुख्य भूमिका असलेला जयेशभाई जोरदार या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

हा चित्रपटात रणवीरने एका गुजराती व्यक्तीची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत अभिनेता बोमन इराणी यांनीही स्क्रीन शेअर केली आहे.

हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून रणवीरसह त्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे. ही अभिनेत्री कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

या चित्रपटात रणवीरच्या अपोझिट दिसणाऱ्या अभिनेत्रीचं नाव शालिनी पांडे आहे.

शालिनी साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री असून ती अर्जुन रेड्डीमध्ये झळकली आहे.

शालिनी खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कायम तिची चर्चा रंगते.

शालिनीचा जन्म २३ सप्टेंबर १९९४ मध्ये झाला. शालिनीने जबलपूरमध्येच अभिनयाची सुरुवात केली.

अर्जुन रेड्डी या चित्रपटातून तिने दाक्षिणात्य कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटात तिने विजय देवरकोंडाच्या अपोझिट भूमिका साकारली होती.

शालिनी यापूर्वी मेरी निम्मो या चित्रपटातही झळकली आहे.

'Nadigayar Thilagam, 'Gorilla' आणि '100% Kadhal' या तेलुगू चित्रपटात ती झळकली आहे.