प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीचा झाला साखरपुडा, शेअर केले सुंदर Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:54 IST2026-04-17T13:47:00+5:302026-04-17T13:54:40+5:30

अभिनेत्रीच्या बहिणीने अनेक वर्ष डिप्रेशनचा सामना केला होता.

मनोरंजनविश्वात सध्या अनेक कलाकार सहजीवनाची सुरुवात करत आहेत. मराठीच नाही तर हिंदी कलाविश्वातही सनई चौघडे वाजत आहेत.

नुकतंच एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीने साखरपुडा केल्याची गुडन्यूज दिली आहे. तिने सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

सोशल मीडियावर या कपलने आधीही एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केले होते. बहिणीसोबत ही अनेकदा व्हेकेशनवर दिसली आहे. कोण आहे ही?

ही आहे आलिया भटची बहीण शाहीन भट. शाहीन भटने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती तिची अंगठी फ्लाँट करताना दिसत आहे.

शाहीन काही वर्षांपासून ईशान मेहराला डेट करत आहे. नुकतंच ईशानने अंगठी घालत शाहीनला प्रपोज केलं.

ईशान मेहरा स्पोर्ट्स आणि फिटनेस कोच आहे. तो सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. तो जास्तीत जास्त जिम रिलेटेड पोस्ट करतो.

तर शाहीन फिल्ममेकर आणि लेखिका आहे. ती बहीण आलिया भटसोबत मिळून 'इटरनल सनशाईन' ही निर्मिती कंपनी सांभाळते.

शाहीन भटने वयाच्या १२-१३ वर्षापासून डिप्रेशनचा सामना केला. 'I've never been (Un)Happier' या पुस्तकात शाहीनने या संघर्षाबद्दल लिहिलं आहे.