PHOTOS : नुसरत जहाँने शेअर केले बेडरूममधील फोटो, क्षणात झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 05:21 PM2022-08-22T17:21:38+5:302022-08-22T17:25:35+5:30

Nusrat Jahan : नुसरत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. सर्वाधिक चर्चा होते ती तिच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोंची. आता ती पुन्हा एकदा अशाच फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

नुसरत जहाँ हे अभिनय आणि राजकारणातलं मोठं नाव आहे. नुसरत ही बंगाली सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. शिवाय तृणमूल काँग्रेसची खासदार आहे.

नुसरत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. सर्वाधिक चर्चा होते ती तिच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोंची. आता ती पुन्हा एकदा अशाच फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

नुसरतने आता बेडरूममधील फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. यात ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय.

बेडरूममधील फोटो शेअर करण्याची अर्थात तिची ही पहिली वेळ नाही. याआधीही असे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत.

नुसरत सोशल मीडियावर अतिशय अ‍ॅक्टिव्ह असते. अनेकदा ती आपले फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

खासदार असण्यासोबतच नुसरत अभिनेत्रीदेखील आहेत. नुसरतने खिलाडी, शोत्रु, खोका ४२०, जमाई, लव एक्स्प्रेस आणि क्रिसक्रोस या सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.

नुसरतने नुकताच मुलाला जन्म दिला. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली होती.

नुसरतने 2019 मध्ये तुर्कीमध्ये निखील जैनसोबत लग्न केलं होतं. मात्र काही काळातच दोघांनी काडीमोड घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता नुसरत बंगाली अभिनेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.