मिथुन चक्रवर्तींचा मुलगाही बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता; सोनाली कुलकर्णीसोबत केलंय काम, अनेकांना माहितच नाही
By देवेंद्र जाधव | Updated: May 15, 2026 15:20 IST2026-05-15T14:58:50+5:302026-05-15T15:20:27+5:30
बॉलिवूडचे डिस्को डान्सर अशी ओळख असलेले अभिनेते म्हणजे मिथुन चक्रवर्ती. मिथुन आजही बॉलिवूडमध्ये सक्रीय असून ते सिनेमांमध्ये छोट्याश्या भूमिका करताना दिसतात. मिथुन यांचा मुलगाही अभिनेता आहे हे फार कमी जणांना माहित असेल.

मिथुन चक्रवर्तीच्या मुलाचं नाव आहे नमाशी चक्रवर्ती. नमाशी सुद्धा प्रसिद्ध अभिनेता असून त्याची भूमिका असलेला आखरी सवाल हा सिनेमा सध्या थिएटरमध्ये गाजतोय.

नमाशीने पुढे विविध सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली. द बंगाल फाईल्स, आर्टिकल १५ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले. विशेष म्हणजे द बंगाल फाईल्समध्ये त्याने वडील मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली.

नमाशीचे सुरुवातीचे शिक्षण ऊटी आणि मुंबईत झाले असून त्याला अभिनयासोबतच चित्रपट दिग्दर्शन आणि लेखनाचीही आवड आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय असून त्याचे आपल्या वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून नमाशीने अभिनय क्षेत्रात यायचं ठरवलं. त्याने २०२३ मध्ये राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'बॅड बॉय' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

नमाशीचे सुरुवातीचे शिक्षण ऊटी आणि मुंबईत झाले असून त्याला अभिनयासोबतच चित्रपट दिग्दर्शन आणि लेखनाचीही आवड आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय असून त्याचे आपल्या वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

नमाशीने मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीसोबत 'गेस्ट' या सिनेमात काम केलं आहे. सध्या नमाशीने संजय दत्तसोबत 'आखरी सवाल' सिनेमात काम करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या सिनेमातील नमाशीच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. आगामी काळात नमाशी बॉलिवूडमध्ये त्याची छाप कशी सोडणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.