Ufff! ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियरने शेअर केले बेडरूममधील फोटो, चाहते क्लीन बोल्ड!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 05:22 PM2022-07-15T17:22:28+5:302022-07-15T17:31:34+5:30

Priya Prakash Varrier Photoshoot: एका व्हिडीओ क्लिपमुळे एका रात्रीत स्टार झालेली ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियर आठवते? हीच विंक गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

एका व्हिडीओ क्लिपमुळे एका रात्रीत स्टार झालेली ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियर आठवते? हीच विंक गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

होय, प्रिया प्रकाशचे हॉट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. प्रियाने बेडरूममधील हॉट फोटो शेअर केले आहेत.

लाल रंगाचा डिप नेक टॉप आणि गुलाबी रंगाची पोलका डॉट पँटमध्ये प्रियाने एकापेक्षा एक बोल्ड पोझ दिल्या आहेत.

याआधी प्रियाने कधीच इतके हॉट फोटोशूट केले नव्हते. त्यामुळे तिचे हे हॉट फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

‘ओरू अदार लव’या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपने प्रिया प्रकाशला एका रात्रीत स्टार बनवले होते.

ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली होती की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली होती.

या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले होते. या क्लिपमध्ये प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’ रोमान्स करताना दिसली होती.

प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे. डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत. मल्याळम चित्रपटातून डेब्यू करणारी प्रिया आता मोठी स्टार झाली आहे.