Ravi Kishan Daughter: खूप सुंदर आणि ग्लॅमरस आहे अभिनेता आणि भाजपा नेते रवी किशनची लेक, पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 11:22 AM2022-07-09T11:22:38+5:302022-07-09T11:25:36+5:30

Ravi Kishan Daughter: भोजपुरी आणि हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता रवी किशन अभिनय आणि राजकारणातील प्रसिद्ध चेहरा बनले आहेत. त्यांच्याबाबत रोज नवनव्या बातम्या समोर येत असतात. आज आम्ही तुम्हाला रवी किशन यांची मुलगी रीवा किशन हिच्याबद्दल सांगणार आहोत.

भोजपुरी आणि हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता रवी किशन अभिनय आणि राजकारणातील प्रसिद्ध चेहरा बनले आहेत. त्यांच्याबाबत रोज नवनव्या बातम्या समोर येत असतात. आज आम्ही तुम्हाला रवी किशन यांची मुलगी रीवा किशन हिच्याबद्दल सांगणार आहोत.

रवी किशन यांच्याप्रमाणेच त्यांची मुलगी रीवा किशन अभिनयाच्या दुनियेत आपलं नाव कमाऊ इच्छिते. आपण अभिनेत्री व्हायचं हे रीवानं लहानपणीच ठरवलं होतं. त्यानंतर तिने नसिरुद्दीन शाह यांच्या अॅक्टिंग प्ले ग्रुपमध्ये प्रवेश घेतला होता.

अभिनय क्षेत्रात आल्यावर कुठलीही त्रुटी राहू नये यासाठी तिने अभिनय आणि फिल्म मेकिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे.

रीवा काही काळासाठी अमेरिकेतही गेली होती. अभिनयाबरोबरच तिने नृत्यामध्येही प्राविण्य मिळवलं आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच डान्सचे व्हि़डीओ शेअर करत असते.

रीवा हिने सब कुशल मंगल या चित्रपटामधून पदार्पण केले होते. मात्र हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नव्हता. मात्र रीवा यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

अभिनयाच्या दुनियेत यशस्वी होण्यासाठी इंटरनेटवर सक्रीय राहिलं पाहिजे, हे रीवाला माहिती आहे. ती सोशल मीडियावर अनेक ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.

तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहिल्यावर ती तिच्य वडिलांप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये कमाल करण्यासाठी तयार आहे, हे दिसून येतं.

आता ती तिच्या वडिलांप्रमाणेच चित्रपट क्षेत्रात यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा आहे.