मोहब्बते फेम किम शर्माने शेअर केला ब्लॅक बिकिनीमधला फोटो, फॅन्स म्हणाले- 'उम्र 41 की और...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 02:57 PM2021-03-20T14:57:27+5:302021-03-20T15:19:49+5:30

किम शर्माने मोहब्बते चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. किम शर्मा सोशल मीडियावर काही हॉट अँड ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमुळे किम चर्चेत आली आहे. या फोटोंना बघून अभिनेत्रीच्या चाहत्यांना विश्वास बसत नाहीय की किम 41 वर्षांची झाली आहे. (Photo Instagram)

किम शर्मा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. किम शर्माचे इंस्टाग्रामवर ५ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

'तुम से अच्छा कौन है', 'नहले पे दहला', 'कहता है दिल बार-बार' आणि 'जिंदगी रॉक्स' या सिनेमांमध्येही तिने काम केले आहे. पण तिला बॉलिवूडमध्ये विशेष स्थान मिळवता आले नाही. करिअरपेक्षा किम तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चेत राहिली. (Photo Instagram)

किम शर्माने २०१० मध्ये बिझनेसमन अली पंजानीशी लग्न केले आणि मुंबई सोडली. ती केनियामध्ये स्थायिक झाली. काही काळानंतर दोघांचा घटस्फोट झाला. (Photo Instagram)

डिसेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा हर्षवर्धन व किम यांच्या डेटींगच्या बातम्या आल्या होत्या. (Photo Instagram)

बाईक राईडपासून ते हॉलिडेपर्यंत प्रत्येक ठिकाणी हे कपल एकत्र दिसू लागले होते. मात्र त्यांचे हे नाते फार दिवस तग धरु शकले नाही. (Photo Instagram)

किम शर्माचे हर्षवर्धनसोबत ब्रेकअप झाले आणि सध्या ती सिंगल आहे. (Photo Instagram)

किमचे नाव 'रॉक ऑन' चे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि डिझायनर अर्जुन खन्ना यांच्याशीही जोडले गेले आहे. (Photo Instagram)