'हम आपके हैं कौन' मधील रिटा आठवतीये? २७ वर्षात झालाय कमालीचा बदल, आता ओळखणंही आहे खूप कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 10:31 AM2022-01-27T10:31:01+5:302022-01-27T10:37:21+5:30

Hum Aapke Hain Kaun:साहिला सध्या कलाविश्वापासून दूर आहेत आणि त्यांची पर्सनल लाइफ इन्जॉय करत आहेत.

माधुरी दिक्षित, सलमान खान, लक्ष्मीकांत बेर्डे, रेणुका शहाणे यांची मुख्य भूमिका असलेला हम आपके हैं कौन (Hum Aapke Hain Kaun) हा चित्रपट साऱ्यांनाच ठावूक असेल.

हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला होता. इतकंच कशाला आजही या चित्रपटाची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला २७ वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र, त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. त्यामुळेच या चित्रपटातील रिटा सध्या काय करते ते जाणून घेऊयात.

Hum aapke hain koun मध्ये प्रेमला(सलमान खान) निशा (माधुरी दिक्षित) आवडत असते. परंतु, प्रेमसोबत लग्न करावं अशी रिटाची प्रचंड इच्छा असते. या चित्रपटात रिटाची भूमिका अभिनेत्री साहिला चड्ढा यांनी साकारली होती.

सध्या सोशल मीडियावर साहिला यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यावर हिच ती हम आपके हैं कौन मधील रिटा आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.

या २७ वर्षात रिटा म्हणजेच साहिला यांच्यात प्रचंड बदल झाला असून त्यांना ओळखणंही कठीण आहे.

साहिला सध्या कलाविश्वापासून दूर आहेत आणि त्यांची पर्सनल लाइफ इन्जॉय करत आहेत.

अलिकडेच साहिला यांनी सलमान सोबत त्यांचा फोटो शेअर केला होता.