'हेरा फेरी' फेम प्रियदर्शनची लेकही लोकप्रिय अभिनेत्री; पहिल्यांदाच cannes ला गेली आणि जगात चर्चा झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 11:02 IST2026-05-16T10:54:36+5:302026-05-16T11:02:46+5:30

हेरा फेरी सिनेमा सर्वांना आठवत असेलच. परेश रावल, अक्षय कुमार, सुनील शेट्टी या जोडीने हा सिनेमा गाजवला. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं होतं. प्रियदर्शन यांची मुलगीही अभिनेत्री असून ती पहिल्यांदाच कान्सला गेली आणि तिची जगात चर्चा झाली.

हेरा फेरी सिनेमा सर्वांना आठवत असेलच. परेश रावल, अक्षय कुमार, सुनील शेट्टी या जोडीने हा सिनेमा गाजवला. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं होतं. प्रियदर्शन यांची मुलगीही अभिनेत्री असून ती पहिल्यांदाच कान्सला गेली आणि तिची जगात चर्चा झाली.

प्रियदर्शनच्या लेकीचं नाव आहे कल्याणी. कल्याणी ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने कान्समध्ये पहिल्यांदाच पदार्पण केलं. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या नवीन लूकच्या फोटोंचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी कल्याणी प्रियदर्शन येथे पोहोचली होती. तिने पांढऱ्या रंगाच्या सुंदर पोशाखात 'भारत पॅव्हेलियन' (India Pavilion) मध्ये हजेरी लावली आणि तेथील एका पॅनेल चर्चेमध्येही सहभाग घेतला होता.

कल्याणीने नुकतेच तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने ऑफ-शोल्डर गाउन परिधान केल्याचे दिसत आहे. या लूकला आणखी मनमोहक करण्यासाठी तिने पांढऱ्या रंगाचे दागिने घातले आहेत

कल्याणीच्या गळ्यातील हार आकर्षक आहे. मोकळे केस आणि हातातील अंगठ्या असा तिचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

कल्याणी प्रियदर्शन ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री असून ती प्रामुख्याने मल्याळम, तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करते.

कल्याणीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सहाय्यक प्रोडक्शन डिझायनर म्हणून केली होती आणि त्यानंतर 'हॅलो' या तेलगू चित्रपटातून तिने अभिनयात पदार्पण केले. वर्ष २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या 'लोका चॅप्टर १' (Loka Chapter 1) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते.